श्री संत भगवानबाबा / Shree Sant Bhagwan Baba


श्री संत भगवानबाबा
पवित्र ते कुळ पावन तो देश |
जेथे हरीचे दास जन्म घेती ||

अवघ्या भारत वर्षात वारकरी संप्रदायाचा झेंडा फडकाविणारे , लखलखत्या विजेसमान प्रभावी वाणी असणारे  सर्व समाज तळागाळातून ढवळून काढून त्यांना योग्य दिशा देणारे युगप्रवर्तक म्हणजे - राजयोगी  श्री संत भगवान बाबा .

संत श्री भगवान बाबा हे एक वारकरी संप्रदयातील प्रबोधनकार होते . त्यांचा जन्म २९ जुलै १८९६ ला सुपे सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे झाला . १८ व्या शतकात मराठवाड्याला  लागुनच असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात निजामाची राजवट होती . त्यांच्या  अन्यायाला आणि जुलुमाला जनता त्रासली होती. अशातच समाजाला भगवान बाबासारखे राष्ट्र संत भेटले ज्यामुळे सामाज परिवर्तनास गती आली .त्यांनी कीर्तनातून समाजप्रबोधनाचे कार्य करून समाजाला योग्य दिशा दाखवली. भगवानबाबांनी अत्यंत अडाणी, दीनदुबळ्या समाजाला नवचैतन्य दिले. भगवानबाबा सन  १९५८ साली भगवान गडाचे  काम पूर्ण करून लोककल्याणासाठी या गडावर  आजन्म झटत राहिले. आजही या गडावर दसऱ्या निमित्त  बाबांचा मोठा भक्त गण जमतो. भगवानगडावर भाविक भक्तांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे.

भगवानबाबांनी अंधश्रधा निर्मुलन , शैक्षणिक कार्य ,नारळी सप्ताह ,पंढरपूर वारी या सारखे समाज हिताची  अनेक कामे केली. समाजात बंधुभाव,एकात्मता ,जागृती, हरिनामाची गोडी निर्माण करण्या मागे भगवान बाबाचा मोठा वाटा आहे.  " समाज सुधारण्यासाठी समाजाने शिकले पाहिजे " असे त्यांचे ठाम मत होते. यासाठी त्यांनी शाळा काढल्या.

भगवानबाबांनी समता , बंधुता स्थापन करण्यासाठी उभे आयुष्य वेचले . १९ जानेवारी १९६५ ला  पुण्यातील रुबी दवाखान्यात बाबांची प्राणज्योत मालवली .बाबांचा भक्तिरसाचा वारसा आजही शेकडो भाविक भक्त जपताना दिसताहेत आणि उत्तरोत्तर तो वाढतच जाईल यात शंकाच नाही ."भगवंतावर प्रेम करा. वेळेप्रमाणे सर्वांचे प्रेम बदलते . भगवंताचे प्रेम बदलत नाही. ते चिरंतन असते , ईश्वर हा आपला सखा आहे . तोच पालनकर्ता आहे. आपले कार्य नीतीला धरून असावे म्हणजे परमेश्वर आपल्याला त्या कामात यश दिल्याशिवाय रहात नाही. एकाचाच  हा सर्व पसारा असल्यामुळे समान बंधुत्वाची जाणीव असणे अगत्याचे आहे."

हेवा - दावा , मत्सर आपण ज्याचा करणार तोच ईश्वराचा अंश असेल तर आपण भगवंतालाच नाराज करणार का कि जो आपला निर्माता आहे . 
_____________________________________________________


English Translation- 


(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)

Shree Sant Bhagwan Baba

In the year of India only, the era of revolutionary means of spreading the flag of the Warkari Sampradaya and spreading all the socially influential voices, giving them the right direction - Rajayogi Shri Sant Baba Baba.

Saint Shri Lord Baba was an enlightenment in a Warakari community. He was born on July 29, 1896 in Supe Sawargaon Taluka Patoda District Beed. In the 18th century, Nizam was ruled by Ahmadnagar district which is situated near Marathwada. The people were complaining about their injustice and oppression. In this way, the community met the nation sages like Lord Baba, which led to social change. They performed social work through kirtana and showed the right direction to the society. Lord Baba gave a new thought to a very rugged, poorly organized society. Bhagwab Baba, in 1958, completed the work of Goddess and continued for the welfare of this fort. Even today, a big devotee of Baba will be present on this fort. Devgad has a very good facility for devotees.

Lord Baba did many works of social evil like blind faith, educational work, narya week, Pandharpur wari. Lord Baba has a big share in building brotherhood, integration, awakening and harmony. He firmly believed that "society should learn to improve society." They got school for this.

Lord Buddha raised his life to establish equality and brotherhood. On January 19, 1965, Ruby Hospital in Pune got the life of Baba .Bhakkarsa 's heritage of Baba is seen today as hundreds of devotees are watching to be seen and progressively they will continue to grow.

"Love God, love of God changes, love of God changes, love of God does not change, it is eternal, that God is our Creator, that is the only God, and that your work should be funded, so that God does not remain united with it. It is necessary to have awareness of brotherhood. "


Envy - The claim, the jealousy, if we are the part of God, then will we displease God that is our Creator.(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)

(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने