लक्ष्मीकांत बेर्डे / Laxmikant Berde

लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱयाया या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले.वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांतला खरा 'ब्रेक थ्रू' मिळाला तो 'टुरटुर' या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली.

मग लक्ष्मीकांतने मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. 'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही.

कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या 'झपाटलेला'पर्यंत ते कायम होते. सचिनबरोबरही 'बनवाबनवी'सह अनेक चित्रपट केले.

त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला 'कॅश' करण्यासाठी 'चल रे लक्ष्या' मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. शिवाय अनेक चित्रपट त्यांना समोर ठेवून काढण्यात आले.

त्यात अनेक पडेल चित्रपटही होते. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले.

मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदी‍त चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली.

मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या 'एक होता विदुषक' या गंभीर नाटकातील भूमिकेने कलक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांना फार काही मिळाल्या नाहीत.

अगदी अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱयाच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला.

असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. पण किडनीच्या आजाराची माहिती इतरांना न देता हलक्या पावलांनी १६ डिसेंबर २००४ रोजी या जगातून निघून गेला.


लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट

धडाकेबाज
दे दणादण
झपाटलेला
हमाल दे धमाल
अशी ही बनवाबनवी
चल रे लक्षा मुंबईला
हसली ती फसली
थरथराट
साजन
बेटा
मैने प्यार किया
हम आपके है कौन

रंगभूमी कारकीर्द-

एक होता विदूषक
लेले विरूध्द लेले
कार्टी प्रेमात पडली
बिघडले स्वर्गाचे दार
शांतेच कार्ट चालू आहे
_________________________________________________________________________________


English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)

Laxmikant Berde
In the name of Laxmikant Berde the Marathi film industry has literally made Dhoom clan for one to two and a half decades. This actor, who has a very timeless timing of comedy. But describing them as a comedic actor only would be unfair to them. The exceptionally good actress who got the acting actress could get the impression of her acting ability.

He also showed his strong acting ability in real many serious roles. However, due to his humorous role, his comedian's stance continued. When Laxmikant got a true 'break through' drama, he played the role of 'Turtur'. This first drama was a tremendous heat. After that 'Shantich kart chalu ahe', 'Bighadale swargache dar', 'Karti chalu' and the plays were also successful.

Laxmikant did not look back. He made his debut in the film. Even there, it proved to be a huge success. His popularity spreads in the name of 'Lakshya'. They got mixed up with Mahesh Kothare. Usually, there is no such thing that the movie of the bag is not untargeted.

Because the storehouse and barde were the sureties of commercial success. At the same time the equation of these two films was 100% guarantee of entertainment. They were permanent till 'Dhum dhadaka', 'Dhadakebaz', 'Thar thrat' from now to 'Zapatlela'. He also made many films with 'Banva Banvee' along with Sachin.

He had a natural gift of acting. His timing is perfect for comedy. Their style of taking them after the audience came forward was unique. In order to "cash" their popularity, there was a similar film like 'Chal Re Lakshya' Mumbai. Apart from this, many films were kept in front of them.

There were also many Padel films in it. Ashok Saraf and Laxmikant Barde added a similar tactic during this period. Actually, the tuning of both artists was very good. However, it was good use for very few directors. Through his films entertaining Marathi minds, many people have forgotten the tension and anxiety in Ayush and festoons of joy.

In Marathi, he had received offers of good organization in Hindi. Rajeshri Productions of 'Mane Pyaar Kiya' is one of them. In this, Laxmikant played the role of a friend of Salman Khan very well. Apart from this, he played a role in many Hindi films. But he got rare roles in the role of acting.

He got such a role in Marathi, but that too little. Senior literature Pu. La. The role of this drama 'Ek Vriddhak', written by Deshpande, has proved to the extent of the acting of Lakshmikant. But they did not get much from the role.

In recent times, he stepped back to Leela and Sir against the leela and walked through the play for many years. But these plays are not very far. He also took a short time from many television channels.

Such a hahunnuni artist continued laughing to the fans. But on 16th December 2004, the light step went away from the world without giving others information about kidney disease.

(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने