तात्या टोपे / Tatya Tope


तात्या टोपे
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचा पाया रचणारे एक लढवय्ये सरदार!
हिंदुस्थानातल्या राष्ट्रभक्तांनी ब्रिटिश शासकांविरुद्ध पुकारलेले १८५७ चे स्वातंत्र्यसमर ही इतिहासातील एक धगधगती घटना. सैनिकांमध्ये असंतोष पसरून १८५७ ची ठिणगी पडली. या लढ्याच्या पार्श्र्वभूमीवर एक मराठी नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. अवघ्या महाराष्ट्राची मान ताठ करणारे हे नाव म्हणजे पेशव्यांचे सेनापती तात्या टोपे. स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान मोठे होतेच, तसेच त्यामध्ये तात्यांचे स्थानही तेवढेच मोठे होते.

१८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यातला त्यांचा जन्म. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. १८५७ च्या समरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती. पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.

नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंचा पराभव या पार्श्र्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.

तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्र्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.

७ एप्रिल, १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेर्‍यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, होता तो देशाभिमान अन्‌ हौतात्म्याचे समाधान! १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. १८ एप्रिल, १८५९ रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आले. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे ऊर दु:खाने पण अभिमानानेही भरून आणणारी ही घटना तात्यांसारख्या मराठी वीराची ख्याती जगभर पसरवून गेली.


________________________________________________________

English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)


Tatya Tope

Sardar is a warrior who created the foundation of Indian independence through the independence of 1857.

1857 freedom fighter called by the nationalists of Hindustan against British rulers, a fateful event in history. In spite of dissatisfaction with the soldiers, 1857 sparked off. On the background of this fight, a Marathi name has been engraved with succinct letters. Peshwa's commander, Tatya Tope, is the only name that sticks to Maharashtra's pride. Maharashtra's contributions to the freedom struggle became bigger, and in the same place Tatya's place was even bigger.

He was born in Yeola in Nashik district in 1814. Tatya is the second child of Pandurang Tope's eight. His original name is Raghunath. His name was also kept as Ram Chandra. Raghunath's father came to Brahmavartas to see the work of the great work of the Peshwa. Alternatively, Raghunath's childhood with Tatya's childhood went with Nanasaheb Peshwe and Queen Laxmibai. Tatta was involved in clerical work for many years in the Nana Court. Nanasaheb selected him as the Chief Commander of the force that came from Gwalior to Tatya's army in 1857. At that time, Tatya's work was tightened. Tatya was ready to climb on Kanpur.

Tatya Tope was the founder of the rise of Delhi, Lucknow, Jagdishpur and Kanpur in 1857. His courageous nature, his knowledge of guerrilla poetry and his faith in Swadeshendra's sword had come under his control. While climbing in Kanpur, Lucknow and Jhansi, the strength of Tatya took shape. The weak army, lack of planning, lack of money and logistics and gun tools, they had to taste success. But Tatya's mission was huge.

One Marathi tiger was facing the enemy in the battle of Nanasaheb Peshwa's identity, against the defeat of Queen Laxmibai in the Battle of Gwalior. Strengthening the enemy, from time to time, the British decided to escape from the clutches of the British and reach their goal. Tatya's heroic story spread all over the world. Some European historians had glorified Tatya's glory.

Tatya's lonely battles got tired, hope of winning The determination that the British did not want to anticipate was permanent. Mansingh's friend went to the shelter while protecting Tatya from the enemy. An incident occurred in the battle of Tatya's bravery, an English army which was trying to track down the militants approached Man Singh. Man Singh's fighter Nadali and Tatya were captured by the British.

On April 7, 1859, answering the allegations, Tatya's face was not afraid, there was no criminality, no sadness, it was the resolve of national pride and martyrdom! The last sacrifice of Tatya's sacrifices in the house kunda of the 1857 Independence War. On 18th April, 1859 he was hanged at Shivpuri in Madhya Pradesh. Their statue has been erected here. The story of Maharashtra's heroes like Tatya, which was filled with pride and pride, filled Maharashtra's reputation as a whole.

(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने