स्व. गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे / Late. Gopinath Pandurangrao Munde

भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व जनपाठिंबा असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होतीे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते.महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक प्रबळ राजकीय पुढारी समजले जातात. त्यांना भाजपमधील ग्रासरूट लेव्हलला काम करणारा नेता असे म्हटले जाते. 
पहा व्हिडीओ इतिहास राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून गोपीनाथ मुंडेची ओळख होती. मुंडेसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी होती.
तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. १२ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता.
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता.
वयाच्या ऐन पंचविशीत इ.स. १९७० मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत असतानाच ते संघाच्या संपर्कात आले. त्यांचे कर्तृत्व बहरू लागले. अशातच मुंडेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९७८ साली बीड जिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.
१९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाईच्या उजनी गटातून जि.प. निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.
१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.
ते अपयशाने खचले नाही. या दरम्यान त्यांचे वक्तृत्व, नेतृत्व अधिकच विकसित होत गेले. सातत्याने त्यांनी लोकांमध्ये मिसळून काम केले. सत्ता नसताना अनेक प्रश्‍न त्यांनी तडीस नेले. त्यांनी आपला मतदारवर्ग पक्षाच्या भिंती तोडून तयार केला. सर्व समाजातील मतदारांनी त्यांना स्वीकारले.
 ३ जून २०१४ रोजी नवी दिल्ली येथे रस्ते घात/अपघातात निधन झाले. आयुष्यभर संघर्ष वाट्याला आल्यानंतर सत्ता आल्यावर त्यांचा झालेला मृत्यू सर्वांना चटका लाऊन गेला.


---------------------------------------------
हेही वाचा
स्व. प्रमोद महाजन यांचा इतिहास

--------------------------------------------

______________________________________________________________

English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)


Gopinath Pandurangrao Munde

He was known as the leader of the Maharashtra state, who was a crowd-ridden speaker and a people-reader in the BJP meeting. He was a former Maharashtra MLA and an important political leader of Maharashtra.

In Maharashtra's politics, he is considered as a strong political leader. He is said to be the leader of BJP's Grassroots level.

Gopinath Munde was one of the leaders of the BJP at the national level. With Munde, there was a big plank of BJP MLAs in Maharashtra state.

It is believed that Munde has done the job of taking the BJP, which is limited to the so-called high class people, to the grassroots. Senior leader LK Advani had done his distinguished commentator (Loknayak) at a function organized in Pune on December 12, 2010.

Pramod Mahajan and Gopinath Munde, BJP's 25 years ago, started campaigning in the rural areas of Beed. Munde-Mahajan both of whom had stirred up the Maharashtra campaign.

While working at the All India Student Council in Parail in 1970, he came in contact with Rashtriya Swayamsevak Sangh. They have started their career. Munde's political career started in 1978 from Beed district in the elections. He never looked back afterwards.

In the year 1978, Gopinath Munde, for the first time, Have tried luck in the elections. In 1980, he was elected from Rayanpur assembly Constituency. He was elected from the same constituency in 1990 and 1995.

Between 1980 and 82, he took the charge of BJP Yuva Morcha and then the National Vice President of BJP. When the coalition government came to power, his Deputy Chief Minister was in charge. In 2009, he was elected to the Lok Sabha for the first time.

It does not fail with failure. During this, his oratory and leadership became more and more developed. He consistently worked in the public. They did many tests while without power. He broke down the constituency of his constituency party and prepared it. All the community voters accepted them.

 Road junction / road crash in New Delhi on 3rd June 2014 After the whole struggle of life, after coming to power, the death of their loved ones has been invoked.

---------------------------------------------
Read also

History of Late. Pramod Mahajan
--------------------------------------------


(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने