अहमदनगरचा भुईकोट किल्ला / Ahmednagar Fort

Photo Copyright by Deviprasad Iyengar

(अहमदनगरचा भुईकोट किल्ला / Ahmednagar Fort (छाया : देवीप्रसाद अय्यंगार))

आदिलशाही, कुतूबशाही, हैद्राबादची निजामशाही यांच्या विरुद्ध बहामनी सेनेचं आक्रमण थोपविण्याची जबाबदारी अहमद निजामशहावर पडली. त्याने आपल्या अतुलनीय शौर्यानं ज्या ठिकाणी बहामनी सेनेला धूळ चारून विजय मिळविला, तो गर्भगिरी पर्वत रांगांलगतचा हा निसर्गरम्य प्रदेश.

नगरच्या भुईकोट किल्ल्याला प्राप्त झालेलं सामरिक महत्त्व तेव्हापासून आजतागायत टिकून आहे. एक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठ्या किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकड्या यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी आहे. टेकड्यांमुळे बुरुजांवर तोफा डागणं अशक्य असल्याने किल्ल्याची अभेद्यता वाढली. वर्तुळाकार असलेल्या या किल्ल्याला २२ बुरूज आहेत. अहमद निजामशहानं आपल्या कर्तबगार, मुत्सद्दी प्रधान, सेनापतींची नावं बुरुजांना देऊन त्यांचा सन्मान केल्याचं दिसून येतं. तटबंदीच्या आतील बाजूस एकूण सहा राजमहाल होते. 'सोनमहल', 'मुल्क आबाद', 'गगन महल', 'मीना महल', 'बगदाद महल', अशी त्यांची नावं आहेत.

इमारतींच्या मध्यभागी एक मदरसाही बांधला होता. या मदरशातच राजघराण्यातील मुलांचं शिक्षण होत असे. दिलकशाद आणि हबशीखा यांनी अशा इतर वास्तूंची निर्मिती गरजेप्रमाणे होत गेली. छोटेखानी गावच किल्ल्याच्या तटबंदीच्या आड वसलं होतं. या साऱ्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चार मोठ्या विहिरी खोदण्यात आल्या. 'गंगा', 'यमुना', 'मछलीबाई', 'शक्करबाई' अशी त्यांची नावं होती. आता या विहिरींचं आणि महालांचं अस्तित्व दिसत नाही. ‘कोटबाग निजाम’ आणि आसपासच्या इतर देखण्या वास्तूंमुळे येथे वैभवशाली नगरी वसली. त्या काळी या नगरीची तुलना बगदाद, कैरो यासारख्या तत्कालीन सुंदर नगरांशी झाल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. 'निजामशाही', 'मोगलाई', 'पेशवाई', 'ब्रिटिश' अशा अनेक राजवटी या किल्ल्यानं अनुभवल्या. राजवटीनुरूप या वास्तूच्या जडणघडणीत बदल घडले. निजामांनी या किल्ल्यात वास्तव्य केले. मोगलांनी किल्ल्याचा सामरिक वापर केला. तर ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर कारागृह आणि दारूगोळा निर्मिती केंद्र म्हणून केला.

Ahmednagar Fort Ilahi Buruj
भुईकोट किल्ल्यावरील इलाही बुरुज (छाया : देवीप्रसाद अय्यंगार)

इतिहासातील अनेक कडू-गोड स्मृती ‘कोटबाग निजाम’ने आपल्या उदरात सामावून ठेवल्या आहेत. कधी या किल्ल्याने तत्कालीन परदेशी मुस्लिमांच्या शिरकाणाने प्रचंड नरसंहार अनुभवला. तर कधी फंदफितुरीची अनेक कारस्थानं इथंच शिजली. अनेकदा भाऊबंदकीची नाट्य घडली. अनेकदा शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने अनुभवले. कित्येकदा किल्ल्याला वेढा पडून तहाचे प्रसंग उठवले. जिथे 'सुलताना चाँद' हिच्या शौर्याचा दिमाख इथल्या शिळांनी अनुभवला तिथेच 'चाँद' हिच्या भीषण हत्येचा साक्षीदार याच पाषाण चिरांना व्हावं लागलं. मोगलांनी किल्ला सर करण्यासाठी जंगजंग पछाडलं, तर पेशव्यांनी बंदुकीची गोळीही न उडविता मुत्सुद्देगिरीने किल्ला काबीज केला. किल्ल्यासाठी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याचे सामरिकदृष्ट्या असलेलं महत्त्व ते जाणून होते. त्याहीपेक्षा आपल्या वाडवडिलांची कर्मभूमी असल्याने हा किल्ला आपल्या अंमलाखाली असावा, असं शिवाजी महाराजांना नेहमी वाटत असे. महाराजांच्या सैन्यानं हा प्रांत तीन वेळा लुटला. यावरून इथल्या सुबत्तेची कल्पना येते. मोगलांचा किल्लेदार मुफलत खान याने सर्व संपत्ती किल्ल्यात आणून ठेवल्याने मराठी सैन्याच्या हाती फारसं काही लागलं नाही. किल्ला जिंकणं ही शिवाजी महाराजांची मनीषाही अपूर्णच राहिली.

सुलताना चाँद हिच्या हत्येनंतर सन १६०० मध्ये पहिल्यांदा हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. पुढे मोघलांचा सरदार कवी जंग याला वैयक्तिक जहागिरी बहाल करून पेशव्यांनी कोणत्याही रक्तपाताविना, मुत्सुद्देगिरीनं हा किल्ला पेशवाईच्या अंमलाखाली आणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. कालांतराने ब्रिटिशांनी पेशव्यांकडून हा किल्ला हस्तगत केला. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रज सेनापती जनरल ऑर्थर वेलस्ली याने खंदकाच्या शेजारील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत.

सन १७६७ मध्ये 'सदाशिवभाऊ' (तोतया), १७७६मध्ये पेशव्यांचे सरदार 'सखाराम हरी गुप्ते' यांना येथे कैदेत ठेवण्यात आले होते. 'राघोबादादा यांचे अधिकारी 'चिंतो विठ्ठल रायरीकर', 'नाना फडणविस', 'मोरोबा दादा', शिंदे यांचे दिवाण 'बाळोबा तात्या', 'सदाशिव मल्हार', 'भागिरथीबाई शिंदे' यांना याच किल्ल्यात तुरुंगवास घडला. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी जर्मन कैद्यांनाही याच किल्ल्यात ठेवलं होतं.

इंग्रज राजवटीच्या विरोधात 'चले जाव' आंदोलनाचं लोण १९४२ साली देशभर पसरल्यानंतर आंदोलनाचे नेते 'पंडित जवाहरलाल नेहरू', 'मौलाना अबुल कलाम आझाद', 'वल्लभ पंत', 'आचार्य नरेंद्र देव', 'सरदार वल्लभभाई पटेल', 'पंडित हरिकृष्ण मेहताब', 'आचार्य कृपलानी', 'डॉ. सय्यद महेबुब', 'डॉ. पट्टाभी सीतारामय्या', 'अरुणा असफअली', 'डॉ. पी. सी. भोज', 'आचार्य शंकरराव देव' आदी नेत्यांना या किल्ल्यात डांबण्यात आले होते. बंदिवासात असताना 'पंडित नेहरू' यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. 'अबुल कलाम आझाद' यांनी ‘गुबारे खातीर’ या ग्रंथाचे लेखन याच किल्ल्यात केले. चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यूही याच किल्ल्यात झाला.

ब्रिटिशांच्या काळात किल्ल्यात बरेच बदल झाले. किल्ल्याच्या पूर्वेला असलेला झुलता पूल १९३२ साली ब्रिटिशांनी बांधला. काडतुसे निर्मितीची प्रयोगशाळा किल्ल्यात उभारली. तिला 'रॉकेटरूम' म्हटलं जायचं. भारतीय स्वातंत्र्याच प्रतीक म्हणून १५ ऑगस्ट १९४७ साली दिल्लीत झेंडावंदन सुरू असताना या किल्ल्यावरील ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ उतरविण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी सोहळा याच किल्ल्यात पार पडला. भारतीय स्वातंत्र्यानंतर या किल्ल्याचं महत्त्वं जरी वाढलं तरी हा किल्ला लष्करी हद्दीत असल्यानं तिथे लष्करी कार्यालय सुरू करण्यात आलं. तेव्हापासूनच पुरातत्व खात्याचं या किल्ल्याकडे दुर्लक्ष झालं. खंदकात प्रचंड झाडी वाढली. 'इलाही' बुरुजाकडे जाणारा पूल कोसळला. दगडी तटबंदीतून झुडपं वाढल्याने किल्ल्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला.

Ahmednagar Fort zulta pul
भुईकोट किल्ल्यावरील झुलता पूल (छाया : देवीप्रसाद अय्यंगार)

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास योजनेत किल्ल्याचा समावेश झाल्याने किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाने आता वेग घेतला होता. नवीन होत असलेल्या सुशोभिकरणाच्या आराखड्यानुसार किल्ल्याच्या आत संग्रहालय, ग्रंथालय, कलादालन, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, माहितीपुस्तिका आदी सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. किल्ल्याच्या तटबंदीजवळ खंदकात नौकानयन, सायंकाळी लेझर-शो आदी योजनाही कार्यान्वित होतील. किल्ल्यात घडलेल्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित ‘ध्वनिप्रकाश’ योजनेच्या सहाय्यानं माहिती देण्यासाठी संहितालेखन सुरू आहे.

स्वातंत्र्यलढयातील अनेक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनातील 'पंडित जवाहरलाल नेहरु', 'सरदार वल्लभभाई पटेल', 'पंडित गोविंद वल्लभ पंत', 'पंडित हरेकृष्ण मेहताब', 'आचार्य जे.बी. कृपलानी', 'डॉ. सय्यद महसूद', 'डॉ. पट्टाभी सीतारामय्या', 'असफ अली', 'डॉ. पी. सी. घोष', 'शंकरराव देव', 'आचार्य नरेंद्र देव' अशा १२ राष्ट्रीय नेत्यांना १० ऑगस्ट १९४२ पासून २८ एप्रिल १९४५ या काळात ब्रिटीशांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबध्द केले होते. स्थानबध्दतेच्या या काळात 'पंडित नेहरु यांनी केलेला पत्रव्यवहार, त्यांच्याच हस्ताक्षरातील पत्रे येथे जतन करुन ठेवली आहेत. ती वाचतांना नेहरुजींचे सुंदर हस्ताक्षर, त्यांचे विचार, त्यांचे हिंदी बरोबरच इंग्रजी आणि उर्दू भाषेतील प्रभुत्व पाहून अभिमान वाटतो.

'चले जाव' आंदोलनातील या सर्व नेत्यांना ज्या खोल्यांमध्ये स्थानबध्द करुन ठेवले होते त्या खोल्यांमध्ये गेल्यानंतर या नेत्यांची माहिती छायाचित्रांसह पाहिल्यावर, वाचल्यावर त्यांच्या उत्कट देशप्रेमाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. किल्ल्यात 'पंडित नेहरु यांना स्थानबध्द केलेल्या खोलीत एक 'कॉफीटेबल बुक' ठेवले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यलढयातील अनेक प्रसंगांची तपशिलवार माहिती तसेच दूर्मिळ छायाचित्रे आहेत. या कॉफीटेबल बुकच्या मुखपृष्ठावर `Life of Nehru Fragrance that still remains `( नेहरुंचा जीवनपट- सुगंध अजून दरवळतो आहे) असे लिहिले आहे. हे वाचतांना या खोलीत स्वातंत्र्य लढ्यातील  घटनांबरोबरच देशभक्तीचा सुगंध अजूनही दरवळत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

१४९० मध्ये अहमद निजामशाहने निर्माण केलेला हा किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून जमिनीवर बांधलेला एकमेव किल्ला आहे. तेव्हा या भुईकोट किल्ल्याला आपण सर्वानी जरुर भेट दिली पाहिजे..

संकलन- देवीप्रसाद अय्यंगार, अहमदनगर

----------------------------------------------------------


English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)


Ahmednagar Fort

Ahmad Nizam Shah was responsible for hindering the invasion of the Bahmani army against Adilshahi, Kutubshahi, Hyderabad Nizamshahi. In his unimaginable courage, where the Bahmani army defeated the dust, this scenic region of the Garbhagiri mountain ranges.

Since then, the strategic importance attained by the fort of Bhuikot has been sustained till date. This fort, which is surrounded by 1 mile 80 yard, is one of the fortresses in Asia, a deep ditch on all sides, and this highway is built on the high hills of the soil, which is not easily accessible to the enemy. Since the hills are impossible to mortar on the bastions, the impenetration of the fort is increased. There are 22 bastions which are circular. Ahmed Nijamshahan appears to have honored his workmen, head, senapati by giving names to the bastions. There were six palaces in the interior of the fort. His names are 'Sonamahal', 'Mulk Aabad', 'Gagan Mahal', 'Meena Mahal', 'Baghdad Mahal'.

There was a madrassa built in the middle of the building. In this madrasa, only the children of the royal family were educated. 'Dikhshad' and 'Habshikha', such other structures, were created as needed. The small village was surrounded by the wall of the fort. Four big wells have been digested for the convenience of water supply. His name was 'Ganga', 'Yamuna', 'Fishbai', 'Shankarbai'. Now there is no existence of these wells and palaces. Due to the construction of 'Kotbagh Nizam' and other nearby tourist attractions, this city was built here. In those days, the city has been compared with the beautiful cities like Baghdad and Cairo. Experiences like Nizamshahi, Mughalai, Peshwai, British and many such castes have enjoyed this fort. There was a change in the formation of this fort, as in the reign of the fort. The Nizam lived in this fort. The Mughals used the strategic use of the fort. The British used this fort as a prison and ammunition manufacturing center.


Kotbag Nizam has collected many bitter-sweet memories from the history. Ever since the fort, the then foreigners of the Muslim community experienced massive massacre. So many of the carpeted carpets have started here. Often the sibling's drama happened. Often experienced in this fort of courageous events. Many times the fort was surrounded by the siege. Whereas the Shill has experienced the virtue of 'Sultana Chand', the stone crusher was witness to the horrific murder of 'Chand'. While the Mughals used to search the entire search mission to siege the fort, the Peshwas captured the fort with no bullets and captured the fort. Many people lost their lives for the fort.

Chhatrapati Shivaji Maharaj founder of Hindavi Swaraj was inspired by this fort. They knew about the strategic significance of this fort. Shivaji Maharaj always felt that this fort should be under his control because of the fact that he was the workplace of his ancestors. Maharaj's army took this province three times. This gives an idea of ​​the subtile here. The Mughal commander Mufat Khan brought all the wealth to the fort and there was not much in the hands of the army. This wish of Shivaji Maharaj won the fort was incomplete.


For the first time in 1600, the fort was captured by Moghulas after the killing of Sultana Chand. Next, the Mughal leader Sardar Kavi Jang was given personal joggery and without any bloodshed, showing Muslim power, under the rule of Peshwas, he completed the dream of Chhatrapati Shivaji Maharaj. Later, the British captured the fort from Peshwa. Before joining the fort, British Army General General Arthur Wellsley sat down under the tamarind tree near the dungeon. Four mortars have been kept in this place for his memory.

In 1767, 'Sadashivabhau' (fake), 'Sakharam Hari Gupte', Peshwa's head, 'Sakharam Hari Gupte' was kept in prison in 1776. The jail of Raghobadada officer 'Chinto Vitthal Rairikar', 'Nana Fadnavis', 'Moroba Dada', Shinde's Diwan 'Baboba Tatya', 'Sadashiv Malhar' and 'Bhagirathibai Shinde' were held in this fort. During World War II, the British kept the German prisoners in the same fort.

After the expulsion of the 'Chale Jaav' movement against the British rule in 1942, the leaders of the movement 'Pandit Jawaharlal Nehru', 'Maulana Abul Kalam Azad', 'Vallabh Pant', 'Acharya Narender Dev', 'Sardar Vallabhbhai Patel', 'Pandit Harikrishna Mehtab' , 'Acharya Kripalani', 'Dr. Syed Mehboob ',' Dr. Pattabhi Sitaramayya ',' Aruna Asafali ',' Dr. P. C. Bhoj, Acharya Shankarrao Deo and other leaders were stuck in this fort. While in captivity, Pandit Nehru wrote the book 'Discovery of India'. 'Abul Kalam Azad' wrote the book 'Gubare Khatir' in the fort. Fourth Chhatrapati Shivaji Maharaj's mysterious death also happened in the fort.

During British times, there were many changes in the fort. The bridge which was built on the eastern side of the fort was built by the British in 1932. The cartridge production laboratory was set up in the fort. She was called 'Rocketroom'. While flagging in Delhi on August 15, 1947, as a symbol of Indian independence, the British's 'Union Jack' was reduced to this fort. The Golden Jubilee celebrations of Indian Independence were held in the same fort. After the independence of India, even if the importance of this fort grew, the fort was started as the fort was under military custody. Since then, the archaeological department has ignored this fort. There was huge tree in the dirt. The bridge going to the 'Elahi' bastion was defeated. Due to the increase of shrines from the fort, the danger of the existence of the fort was created.

The Maharashtra State Tourism Development Scheme has included the fort for the beautification of the fort. According to the new beautification plan, facilities like museum, library, art gallery, basic amenities for tourists, information book etc. will be made available inside the fort. The plans will also be started in the moat near the fort on the fort, laser-show at evening and evening. Encryption is continuing to provide information based on the historical events that happened in the fort with the help of 'Sound Captcha' scheme.

This fort is witness to many events of freedom struggle. 'Pandit Jawaharlal Nehru', 'Sardar Vallabhbhai Patel', 'Pandit Govind Vallabh Pant', 'Pandit Harakrishna Mehtab', 'Acharya J.B. Kripalani ',' Dr. Syed Mehsud, 'Dr. Pattabhi Sitharamayya ',' Asaf Ali ',' Dr. P. C. During the period from 10th August 1942 to 28 April 1945, the British had barred 12 national leaders like Ghosh, Shankarrao Deo and Acharya Narendra Dev in Bhikkot fort of Ahmednagar. During this period of the establishment, 'the letters written by Pandit Nehru were preserved in his handwriting. While reading it Nehruji's elegant handwriting, his views, his Hindi and Hindi-language masterpieces are proud to see.

After going into the rooms which were kept in the rooms of these 'leaders of the movement' movement, after seeing the photographs of these leaders, they could not live without the patronage of their patriotism. In the fort, Pandit Nehru has placed a 'CoffeeTable Book' in a room where he was detained. Among them there are details of many events of independence and also pictures of poor photographs. On the cover of this coffeetable book, 'Life of Nehru Fragrance that still remains' (Nehru's life-scent continues to shine). In spite of this, during the freedom fight in this room, the fragrance of patriotism still prevailed, despite the notion.

The fort built by Ahmed Nizam Shah in 1490 is a masterpiece of architecture and the only fort built on the ground. So we must all go to the fort for this fort.

Compilation- Deviprasad Iyengar, Ahmednagar

Original Post- अहमदनगरी/ Ahmednagar

(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने