महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास टीव्ही मालिकांतून पुढे येण्याची गरज



झी मराठी वाहिनीवर पेशवाईचा काळ, त्यावेळेसचा जाज्वल्य इतिहास दाखवणारी ‘बाजी’ ही मालिका दाखविण्यात येतेय. पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेत ‘बाजी’ची कथा लिहिण्यात आली आहे. त्याकाळचा संदर्भ घेत तयार करण्यात आलेली ही मालिका काल्पनिक असली तरी त्या काळाशी सुसंगत अशी करण्यात आली आहे. ‘शेरा’नावाच्या एका हेराला पेशवाईत विशेष मोहिमेवर पाठवण्यात आले. अटकेपार झेंडे फडकविणाऱ्या मराठा साम्राज्याने देशभरात एक वेगळाच दबदबा निर्माण केला होता. ‘शेरा’ला पेशव्यांचे हे मराठा साम्राज्य संपवण्यासाठी शंभर दिवसांची मुदत देण्यात आली. ‘बाजी’ या मालिकेचे ‘युट्युब’वर असलेले प्रोमो पहिले, असता त्यात दाखविलेली भव्यता, ऐतिहासिक संदर्भ देत करण्यात आलेली मांडणी, उत्कृष्ठ ग्राफिक्सचा वापर करून बनविण्यात आलेल्या या मालिकेतून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अत्यंत भव्यपणे दर्शकांसमोर सादर करण्यात आला आहे. मालिकेचे कथानक ऐतिहासिक धर्तीवरील असले तरी कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. त्याकाळी घडलेल्या काही वास्तव घटनांचा संदर्भ मात्र घेण्यात आला आहे. ‘युट्युब’वरील प्रोमोच्या पहिल्या भागात या मालिकेतील प्रमुख कथानक असलेल्या बाजीची झलक दिसते.


“लाख आलं गनीम, तरी हार मानत नाही... 
ती तलवारीची धार, अन बाजीचा वार...”

अशा शब्दात ‘बाजी’चा पराक्रम दाखविला गेला आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विस्तार दक्षिणेसह उत्तरेतही पेशवाईच्या कार्यकाळात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी मुलखात जणू तेवढाच आत्मविश्र्वास व स्वराज्यनिष्ठा पेशवाईचा काळात मराठा सैन्यामध्ये निर्माण झाली होती. मालिकेत काल्पनिक पात्र रंगवलेला ‘बाजी’ हाही त्याच मराठा सैन्यातील एक शिलेदार. मराठ्यांनी नेहमीच स्वतःच्या जीवाची बाजी स्वराज्यासाठी लावलेली आहे. पेशवाईत जपलेले, वाढवलेले स्वराज्य बेचिराख करण्यासाठी स्वराज्यावर चाल करून आलेल्या ‘शेरा’ याला बाजी कशी मात देणार? याची उत्सुकता मालिकेचा प्रोमो पाहून अधिकच वाढली आहे.


 -----------------------------
(झी मराठी फेसबुक पेज)

शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंत, मराठ्यांचा इतिहास विविध पद्धतीने आपल्या समोर आला. या उज्ज्वल इतिहासाला शौर्य, साहस, धाडस यांची उज्ज्वल परंपरा आहे. या परंपरेत अनेक सुरस आणि चमत्कारिक घटना आपल्याला दिसतात. अनेक ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तवाला गूढ,  अतर्क्य आणि अगम्य घटनांची जोड असल्याचे लक्षात येते.

दुसर्या प्रोमोमध्ये स्वराज्यावर चाल करून आलेल्या ‘शेरा’ या काल्पनिक पात्राची अक्राळविक्रता, आक्रमकपणा, स्वराज्य बेचिराख करण्याविषयी असलेला त्याचा प्रचंड आत्मविश्वास दिसून येतो. “स्वराज्याची चिंता करा, कारण संकट येत आहे”, असे म्हणत शेराने मराठा साम्राज्याला इशारा दिला. स्वराज्यावर चालून येताना ‘शेरा’ दाखवत असलेला आक्रमकपणा आणि या आक्रमकपणाला ‘बाजी’च्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने दिलेले सडेतोड उत्तर असे काल्पनिक कथानक रंगविल्याने मालिका पाहण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

पहा व्हिडिओ
-------------------------------------
(झी मराठी इन्स्टाग्राम अकाउंट)

‘युट्युब’वर असलेल्या तिसर्या प्रोमोमध्ये ‘बाजी’ची प्रेमिका असलेल्या ‘हिरा’ हिची खास झलक दिसून येते. सौंदर्याचं लेण लाभलेल्या हिराचं काळीज मात्र वाघिणीच आहे. मनाने ‘हिरा’ जितकी प्रेमळ दाखविण्यात आलीय, तितकीच ती जिद्दीही आहे. एखाद्यावर प्रेम जडल्यास त्याच्यासाठी दिलाची बाजी लावण्यासही हिरा मागे पाहत नाही, असे हे काल्पनिक पात्र रंगविण्यात आले आहे. १७७४ चा काळ उभा करणं खूप महत्वाचं होतं. त्या काळाला अनुसरून वेशभूषा करणे हे गरजेचे होते. सातारा, सासवड,  भोर,  फलटण या परिसरात अजूनही पेशवाईतल्या खुणा असणारे वाडे आणि वसाहती आहेत. त्याठिकाणी मालिकेचे शुटींग करण्यात आले. अशी ही मालिका सर्वांनी अवश्य पहावी अशीच आहे.

महाराष्ट्रात अशा अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. मात्र या घटना, त्यातील पात्र हे आजपर्यंत दुर्लक्षितच राहिले. ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘धर्मवीर संभाजी महाराज’, ‘बाजीप्रभू देशपांडे’, ‘बाजीराव पेशवे’, ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ आदींचा अपवाद वगळला तर इतर ऐतिहासिक वीरपुरुष दुर्लक्षितच आहेत. दुर्लक्षित राहिलेल्या वीरपुरुषांमध्ये ‘क्रांतिकारक अनंत कान्हेरे’, ‘महान स्वातंत्र्य योद्धा वीर उमाजी नाईक’, ‘पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी’, ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर’, ‘तात्या टोपे’, ‘तानाजी मालुसरे’ आदींचा समावेश आहे.

पहा व्हिडिओ 
---------------------------------
(झी मराठी ट्वीटर अकाउंट)

महाराष्ट्रातील अनेक शहरे, गावे यांनाही खूप मोठे ऐतिहासिक संदर्भ आहेत. जवळपास प्रत्येक शहराची, जुन्या काळातील गावांची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. ऐतिहासिक, राजकीय इतिहासाच्या बरोबरीने आर्थिक, सामाजिक, धार्मिक,  साहित्यिक अथवा वाङ्मयीन इतिहास महाराष्ट्राला आहे. चित्रपटसृष्टीचा इतिहास,  वाहतूक संकल्पनेचा इतिहास, शास्त्रांचा इतिहास, मंदिरांचा इतिहास, गावांचा इतिहास, आडनावांचा इतिहास, वाङ्मयाचा इतिहास सध्यातरी रंगभूमीपासून दूरच आहे.

१९व्या शतकात महाराष्ट्रात बहुपदरी परिवर्तन घडून आले. हा काळ सामाजिक- सांस्कृतिकदृष्टय़ा गतिमान अभिसरणाचा, राजकीय- शैक्षणिक- वाङ्मयीन आणि सांस्कृतिक घटितांनी भरलेला, अनेक व्यक्तींनी गजबजलेला होता. ब्रिटिश राजवटीची सुरुवात, रेल्वे- तारायंत्र, वीज इत्यादी शोध, १८५७ साली झालेली मुंबई विद्यापीठाची स्थापना, गोदी- गिरण्या, कारखाने यांचा उगम, छापखान्यांच्या प्रारंभाने रुजू लागलेली मुद्रण संस्कृती, मूकपट व त्यामागोमाग बोलपटांची निर्मिती, या साऱ्यांनी १९ व्या व २० व्या शतकातील महाराष्ट्र ढवळून निघाला. या काळातील अनेक घटना, प्रसंग आणि व्यक्ती आजदेखील तत्कालीन महाराष्ट्राच्या जडणघडणीविषयी आस्था व कुतूहल वाटणाऱ्याला खुणावत राहतात. हा इतिहास अशा पद्धतीच्या मालिकांमधून सर्वांपुढे आल्यास त्यातून नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. ‘बाजी’ या मालिकेतील पात्र जरी काल्पनिक असले तरी त्यातून तत्कालीन मराठा साम्राज्याची झलक दिसून येत आहे.

#BaajiOnZeeMarathi

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने