हरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort

(हरिश्चंद्रगड किल्ला / Harishchandragad Fort (छाया सौजन्य : विकीपेडिया))

हा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.
सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत.

खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. राष्ट्रीय महामार्ग २२२ असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावरखुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.

हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी यू आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे.

पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणार्‍या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.

येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.

मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.

हरिश्चंद्रगडाचे सर्वांत जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.


(गणपती, हरिश्चंद्रेश्वर मंदिर (छाया सौजन्य : विकीपेडिया ))

हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा,जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड,भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात. महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.

गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली

मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.

'शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा ।
मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥
हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
सुरसिध्द गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥
मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥
जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'

हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.

या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु 'U' आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो.

______________________________________________

English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)


Harishchandragad Fort

This fort is on the border of three districts of Pune, Thane and Ahmednagar. From Pune, Thane and Ahmednagar to the border of three districts, one side of Sahyadri runs east. This range is known as the queen of Harishchandra. Harishchandra Gad is the fort at the beginning of this geographically important quadrangle.

With the names of these peaks like Harishchandra, Taramati and Rohidas, this fort has been directly linked to the local fables from King Harishchandra. Changdeva had made penance in the caves on Harishchandra fort.

Harishchandragad, which is on the main line of Sahyadri, is 1424 meters high above sea level. There are three main components to go to the fort.

Khareshwara is easy to use because it is very easy to use. National Highway 222, the royalist goes through the Malseuse Ghat. There is a bluff on the head of this dam. This hoax can go to Khireeshwar. Also from Pune to Khareeshwar ST There are also buses. There is Ashramshala on the way from Khubate to Khireshwar. At the time of the problem, it can be possible to stay on request. There is also an ancient temple on the same road.

Harishchandra Gada's crown is very spacious and it looks very great from the bottom. Its east side is the English U-shaped pass. This passage is the famous collar track. This pass is a link between Pune and Nagar districts.

It takes about an hour and a half hours to reach the base from the base to the Tolar window. There is no water anywhere on the way. So, come with the water bottles. All this is in the forest. A tiger-sculpted rock stack that suggests that there is a tiger in this area stands in the collar trolley. Next to the ridge, the path goes towards the pinnacle. Towards the west side of the passage, we can take the route to the top of Harishchandra. The piles are excavated in the rock on the road from the crossing. Within half an hour, we get inside the walls.

From here it is about 3-4 km from the debris. Me Have to go. On this route, directional arrows are painted in many places. In this way we reach the level of the Tamatani peak. Here is the temple of Harishchandreshwar. The caves are carved on the north end of the Taramit hill. Harishchandareshwar is an idol in the temple door. In the corners of it were the first idols. The temple is in front of the Nandi. It is a temple in 12 temples built by Jhanj Raja in the early 10th and 11th centuries. The temple has a carved cave.

There is a mud of water flow on the north side of the temple. There is a cave of Kedareshwar in this coral. There is a good thing in this. Pindi is filled with water. The exhibition can be beaten.

The most attractive place of Harishchandragarh is the west corner. The edges are hollowed off as the edges of the Konkan. The edges falling in Konkan below three thousand feet, in the middle, are in the middle of about 75 feet in the middle. It has to be seen on the top of the stairs (and without a hug). If you want clean air, you can see the region from here to Kalyan.

From Harishchandragad to Shivneri, Hudsar, Chawand, Nimgiri, Sindola, Jivdhan, Gorakhgad, Machchindra, Siddhagad, Mahuli, Kaladgad, Bhairavgad, (Moroshi), and Bhairavgad (Shirpunje), Kunjarad Fort are seen. This fort is different from other traditional forts in Maharashtra. Do not see the walls found in other forts here. There are ancient caves on this fort, and it is generally Shivamandir of the ancient Sholivahan period of the 12th century. It is known as an intimate remote fort of Sahyadri.

When we are missing out on the depths of the darkness, the free passage of nature, its rudra, and the different inventions of nature can be found in the journey of the mind of the goddess Harishchandra. But to see all this, we need to keep at least two days hand in hand. In 1835, Colonel Sachs had seen Indravjr at Konkan. In 1747-48 this fort was taken by the Marathas and appointed Shri Krishna Shinde as the fort.

There is a wall of stone in the courtyard of the temple. In front of the wall of this species there is a stone bridge. It is also known as 'the origin of Mangalganga' which flows from one leveh Taramat peak below this bridge. Next, the river flows through the village of Pankhachai. There are many caves in the premises of the temple. Some caves are suitable for staying and some caves have water. The water in these caves is chilled and neat. There is a fourth in the cave behind the temple. This square has a room under the ground. There is a huge stone on it. Local villagers say that in this room, 'Changdeo Rishi' had done penance for fourteen years.


The biggest attraction of this fort is the Konkan Koda. It is known as the tallest cliff in Maharashtra, which is more than 3,000 feet tall. This verse is of the UK's U-shape. It is the outer circular shape, not like 90 degrees. If you look in front of it, it looks like a nag choke.

(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने