निवृत्तिनाथ / Sant Nivruttinath

निवृत्तिनाथ

संत ज्ञानेश्वर हे त्यांचे धाकटे भाऊ. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आ​णि गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

ग​हिनीनाथ हे ​निवृत्तिनाथांचे गुरू होते. ‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हा​चि होय । ग​यिनीनाथे सोय दाख​विली ॥’, असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठे​विले आहे सुमारे तीन-चारशे अभंग आ​णि एक ह​रिपाठ एवढी रचना, ​निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथा​पि निवृ​त्तिनाथांची ख्याती आ​णि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे. त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश ​दिले व आपण त्या यशापासूनही ​निवृत्त झाले’ असे निवृ​त्तिनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ ‌‌‌त्यांच्या सोबत होतेच.निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृ​त्तिनाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा. म. आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेविली आहेत.

ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे.
साभार विकीपेडिया 
_______________________________________________

English Translation- 


(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)

Sant Nivruttinath

Saint Dnyaneshwar is his younger brother. Gahinath in the Nath sect gave Diksha to the Nivittinath.

Nivrutti's birth year is 1273 or 1268 years old. Nivruttinath was the eldest of the four siblings of Dnyaneshwar, Sopan Dev Muktai and NivruttinathNivruttinath was the senior brother and teacher of Dnyaneshwar. Nivruttinath ordered Dnyaneshwar to write the poem that is in Sanskrit and write it to the common people. Accordingly, Dnyaneshwar wrote Bhavarthdipika (Dnyaneshwari).

Gahininaath was the teacher of Nivruttinath. Nivrutti's goal is Krishna. It has been said that Nivruttinath's only one of his abhangas has been destroyed. About three to four hundred Abhangs and one transcript of this type, definitely can be said of Nivruttinath. Yoga, Advaitaar Ani This is an unbroken, like Krishnabh Kittipar. They seem to be somewhat less in terms of ritualism; And Nivruttinath's reputation and importance are not as a poet, but as a guide for Dnyaneshwar. It is said about Nivruttinath that he gave 'his entire spirituality to Dnyaneshwar and gave him success and you retired from his success'. Dnyaneshwar has expressed his respect for him in many places. Nivruttinath was also accompanied by Dnyaneshwar in many pilgrimages with devotees. It is said that Nivatadadevi, Nivrutti and Shastri Gita were written by Nivruttinath. However they are unavailable. Ra M Athavale has given a nod to the book titled 'Nivratestswari'. Like Dnyaneshwari, this is a commentary on the song too. However, it is not yet proved that this book is of a new generation. In the Shri Samarth Vagdev Temple of Dhule, two handwriting such as 'Precise Bhagwad Gita' and 'Samadhi Bodh' were named as 'Nivruttinath'.


After the completion of Dnyaneshwar and Sopan Dev, Muktaini's 'Eating water gram' was made from Parlokas and soon afterwards Nivruttinath had also kept body in Trimbakeshwari. Their samadhi has been built there.


Sincerely, Wikipedia


(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने